"गाडगे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७७:
*१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
* गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
* डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानीगुरूस्थानी मानत असत.
*८ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे महाराजांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन करण्यात आले आहे. त्यांच्या हयातीतील त्यांच्या आवाजात असलेले मूळ ध्वनी मुद्रित करण्यात आलेले एकमेव किर्तन असल्यामुळे याद्वारे आपणाला त्यांचे स्पष्ट व परखड विचार ऐकण्यास मिळतात व गाडगेबाबा समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास आपणाला फार मोठी मदत होते.( ते कीर्तन आपण You tube इथे ऐकू शकता.)
* १४ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले.
ओळ ९२:
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरूवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा अन् आम्हालाबी ब्राह्मण करा."
 
गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचा होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पूढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानीगुरूस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी / पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. यात जागेवर 500 लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सदगुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांची अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.[https://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=1052]
 
कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.[https://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=1052]