"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३६:
 
==उमेदवारीचा काळ==
वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री वामन बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून ([[आद्य शंकराचार्य|शांकर]])[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी ([[दंडी]]च्या [[काव्यादर्श|काव्यादर्शावरचा]] सटीक ग्रंथ [[बेलवलकर|श्रीपाद कृष्ण बेलवलकर]] यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित [[रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी]] यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठी असलेली [[जगन्नाथ शंकरशेट]] शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती.
 
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र.