"एन. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
'''दत्ता बाबुराव नाईक''' ऊर्फ '''एन. दत्ता''' (जन्म : मुंबई, १२ डिसेंबर १९२७. - ३० डिसेंबर१९८७) हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी [[संगीत दिग्दर्शक]] होते. त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी ते वयाचे एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपल्या पित्याच्या मूळ गावी-गोव्यातल्या अरोबा येथे रहायला आले. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील निधन पावले आणि त्यांचा सांभाळ आई, मामा आणि आजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. त्यांच्या पूर्वजांच्या अरोबा येथील घराच्या जवळ एक खूप जुना विशाल पिंपळाचा वृक्ष होता. त्या झाडाच्या आसपास दर गुरुवारीगुरूवारी लोक जमा होत आणिअभंगांची आणि गीतांची मैफल भरे. छोटा दत्ता या गीतांमध्ये रमून जायचा. तेथेच तो हार्मोनियम वाजवायला शिकला. त्याकाळात कोल्हापूरहून आणि रत्नागिरीहून फिरत फिरत येणाऱ्या नाटक मंडळीशी संबंध आला. त्यांच्या नाटकांतली गाणी ऐकायला आणि गायक नटांचा अभिनय पहायला मिळाला. ती गाणी ऐकून दत्ताने आपल्या मामालकडे गाणे शिकायचा हट्ट केला. मामाने उत्तरादाखल छडी दाखवली.
 
दत्ताने बंड केले. एका रात्री तो चुपचाप घरातून पळाला आणि मुंबईत आला. आल्याआल्या त्याने बी.आर देवधर यांच्या संगीत वर्गात नाव घातले. त्यानंतर जिथून जमेल तेथून संगीताचे ज्ञान मिळवायला सुरूवात केली. फिरताफिरता एन. दत्ता हे मास्टर [[गुलाम हैदर]] यांना भेटले आणि त्यांच्या ऑर्केस्ट्रात सामील झाले. [[गुलाम हैदर]] यांचे वादनकौशल्य त्यांनी हळूहळू आत्मसात केले.
८३,००२

संपादने