"उमाजी नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४०:
उमाजीराजे नाईक यांचा जन्म [[रामोशी-बेरड]] समाजात [[लक्ष्मीबाई]] व [[दादोजी खोमणे]] यांच्या पोटी [[७ सप्टेंबर १७९१]] रोजी [[पुणे]] जिल्ह्यातील [[किल्ले पुरंदर]] येथे झाला.वडिल दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब [[पुरंदर व वज्रगड]] किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना [[नाईक]] ही [[पदवी]] मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी [[पारंपरिक]] [[रामोशी]] [[हेर कला]] लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील [[दादोजी नाईक]] यांच्याकडून [[दांडपट्टा]], [[तलवार]], [[भाला]], [[कुऱ्हाड|कुऱ्हाडी]], [[तीरकमठा]], [[गोफण]] वगैरे चालवण्याची [[कला]] अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरूवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात [[दुसरा बाजीरसव पेशवा|दुसऱ्या बाजीराव पेशव्यास]] स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीराजे बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत [[विठोजी नाईक]], [[कृष्ण नाईक]], [[खुशाबा रामोशी]], [[बाबू सोळस्कर]] यांना बरोबर घेऊन [[कुलदैवत]] [[जेजुरी]]च्या श्री खंडोबारायाला [[भंडारा]] उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
 
उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, [[सावकार]],मोठे [[वतनदार]] अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवातसुरूवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले .या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक केले.आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी [[मॉकिनटॉस]] याने [[सासवड-पुरंदर]] च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीराजेंच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका सैन्य तुकडीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
 
इंग्रजांणसारख्या बलाढ्य शत्रुशी मुकाबला करायचा म्हणजे मोठे मणुष्यबळ असायला हवे .म्हणजेच सैन्य व प्रचंड खर्च आलाच.पण उद्देश महान असल्यामुळे ते साधनाअभावी थांबले नाहीत.ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानायचे असे खुद्द इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने नमूद केले आहे. २४ फेब्रुवारी १८२४ ला उमाजीराजेंनी [[भाबुड्री]] येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.