"सुंदरबन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎खारफुटीचे धार्मिक महत्त्व: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
[[पश्चिम बंगाल]] आणि [[बांग्लादेश]] यांदरम्यान गंगेच्या [[त्रिभुज]] प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले हे जगातले सर्वात मोठे [[खारफुटी]]चे जंगल आहे. साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी [[सदाहरित]] जंगलातील स्पर्धात्मक वातावरणापासून फारकत घेऊन काही वनस्पती नद्यांच्या मुखाशी वसलेल्या [[भरती]]-[[ओहोटी]]च्या प्रदेशात राहू लागल्या. अनुकूलनातून त्यांनी स्वतमध्ये काही बदल घडवून आणले व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहण्याचे कसब बाणवले. काळाच्या ओघात साधारण ७० जातींच्या वनस्पतींनी अशा प्रकारे निराळे जीवन सुरू केले. समुद्राच्या क्षारतेसमोर टिकाव धरण्याची क्षमता असल्यामुळे या वनस्पतींना [[मराठी]]त ‘[[खारफुटी]]’ म्हणतात.
 
[[नर्मदा]] व [[तापी]] सोडल्यास, भारतातील बहुतेक मोठ्या नद्या पूर्ववाहिनी असल्यामुळे, भारतात [[खारफुटी]] वनस्पती पूर्व किनार्‍यावरकिनाऱ्यावर जास्त प्रमाणात आढळतात. भारताची [[पूर्व]] किनारपट्टी रुंद असून ती सौम्य उताराने समुद्रात बुडते. यामुळे भरती-ओहोटीचे विस्तृत क्षेत्र मिळते व याच क्षेत्रात [[खारफुटी]] वनस्पती चांगल्या वाढतात.
 
==सुंदरबनातील प्राणी==
ओळ १६:
भारतात [[चेन्नई]]जवळ चिदंबरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात.
 
ठाणे जिल्ह्यातील काही गावी खारफुटीचे संरक्षण करणारी एक गाव समिती असते, या समितीमार्फत मर्यादित प्रमाणात खारफुटीचे लाकूड गोळा करता येते. पण कोणीही जर मर्यादेपेक्षा जास्त लाकडे तोडली तर समिती निवाडा करून मर्यादाभंग करणार्‍यालाकरणाऱ्याला शिक्षा देते. शिक्षेनुसार त्या व्यक्तीला रात्रभर खारफुटीच्या झाडाला बांधून ठेवायची तरतूद आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=https://www.loksatta.com/lekha-news/vivek-kulkarni-article-from-marathi-book-vedh-paryavaranacha-1485480//lite/ | title=खारफुटीची जंगले | publisher=लोकसत्ता | date=४ जून २०१७ | accessdate=६ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=विवेक कुलकर्णी}}</ref> इतकी कडक शिक्षा ठेवल्यामुळे कोणीही या वनस्पतीचा दुरुपयोग करीत नाही व या वनस्पतीचे संवर्धनही योग्य रीतीने होते.
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंदरबन" पासून हुडकले