"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू (2) using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८:
आणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले आहे, या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास [[भुलेश्वर]] व दुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कऱ्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.
 
भागवतधर्माचे सासवडचे [[संत सोपान देव]], गणेशभक्तांचे आधिदैवत श्री मोरेश्वर आणि कऱ्हेच्या पावन तीरावरील स्वयंभू शिवालये ही या विस्तीर्ण पठाराची भूषणे आहेत. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर याने येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रारमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामिनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामिभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर [[उमाजी नाईक]], प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा, आचार्य प्र,के. अत्रे, जेजुरीच साहित्यमार्तंंड यशवंतराव सावंत, माळशिरस भुलेश्वरचे प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कऱ्हेपठार. श्री यादव यांनी क-हाकाठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी येथे सुरू केले. छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनही गेली अकरा वर्षे ते भरवीत आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी भरीव काम करुनकरून पुरंदरच्या वैभवात भरच टाकली आहे. यादवकालीन भुलेश्वर, वारीच्या वाटेवर या महाकादंबरीचे ते लेखक आहेत. सासवड येथे २०१४ रोजी झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष होते.
 
कऱ्हे पठारालाच काहीजण कडे पठार म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले