"विक्रम संवत्सर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात (2)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
[[वर्ग:रिकामी पाने]]
 
विक्रम संवत ही सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेली दिनदर्शिका आहे. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही वर्षगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. नेपाळमध्ये ही दिनदर्शिका अधिकृतरीत्या वापरली जाते. विक्रमादित्याने शकांवरील विजयानंतर ही दिनदर्शिका सुरू केली. त्यावेळी नवीन विक्रम संवत्सर (=वर्ष) हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होत असे. सध्या, उत्तरी भारतात नवीन विक्रम संवत्सर हा चैत्र कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. हा कृष्णपक्ष शुक्लपक्षाच्या आधी येतो. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवातसुरूवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. विक्रम संवत्सर(=वर्ष) हे ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी सनाच्या आकड्यापेक्षा ५६ने अधिक असते. म्हणजेच इ.स. २०१४ हे विक्रम संवत २०७० होय. जेव्हा विक्रम वर्षाची सुरुवातसुरूवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते तेव्हा चैत्रातल्या पाडव्यापासून ते ३१ डिसेंबरपर्यंत विक्रम संवत इसवी सनापेक्षा ५७ने अधिक असतो. १ जानेवारी ते फाल्गुन अमावास्येपर्यंत हा फरक ५६चा असतो.
 
महाराष्ट्र-गुजरातेतल्या पंचांगाप्रमाणे, नवीन विक्रम संवत्सराची सुरुवातसुरूवात ही कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून होते. त्यामुळे त्या दिवसापासून ते ३१ डिसेंबरपर्यंत विक्रम संवत्सराचा अनुक्रमांक हा इंग्रजी वर्षक्रमांकापेक्षा ५७ने अधिक असतो. १ जानेवारीपासून ते आश्विन अमावास्येपर्यंत हा फरक ५६चा असतो.
 
शकसंवत्सराप्रमाणे विक्रम संवत्सराला नाव असते.