"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री. हे नावाजलेले शास्त्री आणि पुराणिक होते. वडील निर्वतल्यावर रामजोशींना त्यांनीच सांभाळले. रामजोशींना लहानपणापासूनच तमाशाचा छंद होता. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता. घरासमोरच धोंडिबा शाहिराचा फड होता. रामजोशी नेहमी तिकडे जाऊन बसत. त्यामुळे त्यांना लावण्या रचण्याचा व डफावर गाणी म्हणण्याचा षोक लागला. वयाची विशी उलटून गेली तरी संस्कृत भाषेचा गंध नसलेल्या रामजोशींना, मुद्गलशास्त्रींनी घरातून घालवून दिले. तेव्हा रामजोशी नेसत्या वस्त्रानिशी पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथे वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करून काव्यालंकार आणि व्याकरणशास्त्र यांचा अभ्यास केला.
 
गुरूंची अनुज्ञा घेऊन रामजोशी सोलापूरला परतले. तेथे वडील बंधू आजारी असल्याचे पाहून रामजोशींनी त्यांच्याऐवजी देवळांत पुराण सांगायला सुरुवातसुरूवात केली. पुराण सांगण्याची त्यांची अनोखी धाटणी पाहून सोलापूरकर आणि मुद्गलशास्त्रीही प्रसन्न झाले. इ.स. १७९३पासूनच्या पुढील काळात रामजोशी उत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध पावले.
 
रामजोशींचा बारामतीला बाबुजी नाईक यांच्या वाड्यात तमाशा होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या ’भला जन्म हा तुला लाधला’ आणि ’दो दिवसांची तनु ही साची’ या दोन वैराग्यपर कवनांनी तिथे असलेले [[मोरोपंत]] संतुष्ट झाले. त्या दिवसापासून [[मोरोपंत]] आणि रामजोशी यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर व स्नेह वाटू लागला, आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. रामजोशींनी मोरोपंतांच्या आर्या आपल्या कीर्तनांतून लोकप्रिय केल्या. या पुढील काळातील रामजोशींच्या काव्यरचनेवर मोरोपंतांची बरीच छाप आहे.