"राम आपटे प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
१९९० मध्ये डॉ. राम आपटे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातूनच १९९१ मध्ये डॉ. राम आपटे यांचे १७ स्नेही एकत्र आले. त्यांत डॉक्टर, प्राध्यापक, वकील, उद्योजक आणि व्यावसायिक होते. त्यांनी एकत्र येऊन डॉ. राम आपटे प्रतिष्ठानची स्थापना केली. डॉ. राम आपटेंचे स्नेही डॉ. बी. व्ही. तथा बाळासाहेब कुळकर्णी हे पहिले आणि डॉ. अशोक दातार हे प्रतिष्ठानचे दुसरे अध्यक्ष झाले. हे प्रतिष्ठान स्थापन करण्याची मूळ कल्पना कै. रामूशेठ अग्रवाल यांची होती आणि तिला कै. प्रा. श्रीरंग राजे यांनी मूर्त रूप दिले होते.
 
==प्रतिष्ठानने जळगावात करवलेले सुरुवातीचेसुरूवातीचे कार्यक्रम==
* १ फेब्रुवारी १९९१ला झालेला पहिला कार्यक्रम : पंडित कुमार गंधर्व यांचे गायन
* २ फेब्रुवारी १९९१ला झालेला दुसरा कार्यक्रम : डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, ज्योती सुभाष व शुभांगी संगवई यांच्या प्रमुख भूमिका असलेले आत्मकथा हे नाटक.
ओळ २७:
** दुर्गा झाली गौरी हे बालनाट्य
** जांभूळ आख्यान हे लोकनाट्य
** असा मी असामी, आईचं घर उन्हात, आत्मकथा, आम्ही लटिके ना बोलू, एक झुंज वार्‍याशीवाऱ्याशी, कबड्डी कबड्डी, कस्तुरीमृग, कोण म्हणतं टक्का दिला, खरं सांगायचं तर, गांधी आणि , आंबेडकर, गांधी विरुद्ध गांधी, घाशीराम कोतवाल, चिरंजीव सौभायकांक्षिणी, नकळत सारे घडले, बम्बई के कौए, भले तरी देऊ, मित्र, मी पणशीकर बोलतोय, राहिले दूर घर माझे, वगैरे नाटके.
** मंगेश पाडगावकर व वसंत बापट यांचे काव्यवाचन, [[भक्ती बर्वे]] यांचा ’पुलं, फुलराणी आणि मी’ हा एकपात्री कार्यक्रम, [[विजय तेंडुलकर]] यांची [[सुधीर गाडगीळ]] यांनी घेतलेली प्रगट मुलाखत, दिलीप प्रभावळकर यांचा गाजलेला ’मुखवटे आणि चेहरे’ हा कार्यक्रम वगैरे.
** बंगलोरच्या रमणमहर्षी अकादमीच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी सादर केलेला ’तिमिरातून तेजाकडे’ हा आगळावेगळा कार्यक्रम आणि [[मंगला खाडिलकर]] यांचा ’आरसा’ हा एकपात्री प्रयोग.