"पहिला सुलेमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Suleyman young.jpg|thumb|right|200px|पहिल्या सुलैमानाचे चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १५३० अंदाजे)]]
'''पहिला सुलैमान''' (अन्य मराठी लेखनभेद: '''पहिला सुलेमान''', '''सुलैमान १''' ; ओस्मानी तुर्की: سليمان ; [[तुर्की भाषा|आधुनिक तुर्की]]: ''I. Süleyman'' ;) ([[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १४९४]] - [[सप्टेंबर ६]], [[इ.स. १५६६]]) हा [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्याचा]] १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीतकारकीर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली [[बेलग्रेड]], [[हंगेरी]] या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील [[व्हिएन्ना|व्हिएन्नाचा]] वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही [[बाल्कन]] व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. [[इराण|इराणातल्या]] [[सफवी साम्राज्य|सफवी साम्राज्याशी]] चाललेल्या संघर्षात त्याने [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेतही]] मुसंडी मारत त्याने आजच्या [[अल्जीरिया]]पर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रापासून]] [[तांबडा समुद्र]] व [[इराणचे आखात|इराणच्या आखातापर्यंत]] पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीतकारकीर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती.
 
== बाह्य दुवे ==