"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक होते. ते [[महानुभाव]] पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. [[लीळाचरित्र]] या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
 
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवातसुरूवात झाली आहे.
 
==प्रारंभिक जीवन==
ओळ १०:
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले.<ref>[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ६</ref> या घटनेमुळे हरिपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.
 
गृहत्याग करण्यासाठी हरिपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व [[भडोच]]चे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरिपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी [[अमरावती]] जिल्ह्यातील [[देऊळवाडा]] येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवूनठेऊन दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ७</ref>
 
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरिपाळदेव [[रिद्धपूर|ऋद्धिपूर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभू]] दिसले. [[गोविंदप्रभू|श्रीगोविंदप्रभूंपासून]] हरिपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.<ref name="leela7"/> याचवेळी [[गोविंदप्रभु|गोविंदप्रभूंनी]] त्यांना चक्रधर हे नाव दिले.<ref>संकपाळ (२००९) पृ. १२</ref>