"सिद्धेश्वरी देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो (Bot: Reverted to revision 1597263 by ज on 2018-05-25T01:45:52Z)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0)
त्या जन्मल्यावर काहीच वर्षांत त्यांचे माता-पिता निवर्तले आणि सिद्धेश्वरीच्या संगोपनाची जबाबदारी त्यांची मावशी, मान्यवर गायिका राजेश्वरी देवी यांनी स्वीकारली.
 
संगीतमय घरात राहूनही सिद्धेश्वरी देवींचे संगीत क्षेत्रात आगमन अपघाताने झाले. राजेश्वरी देवींनी आपली कन्या कमलेश्वरी हिच्यासाठी गाण्याची शिकवणी लावली होती. कमलेश्वरी गाण्याचे धडे गिरवत असे तेव्हा सिद्धेश्वरी घरकाम करत असे. एकदा निष्णात सारंगी वादक सियाजी मिश्रा कमलेश्वरीला शिकवत असलेला टप्पा तिला शिकवल्याप्रमाणे गाता येत नसल्याने संतापलेल्या राजेश्वरी देवींनी कमलेश्वरीला छडीने बडवायला सुरुवात केली. कमलेश्वरी जोरजोरात रडू लागली. तिचे रडणे ऐकून घरात काम करत असलेली तिची मैत्रीण व बहीण सिद्धेश्वरी तिथे धावत पोहोचली व आपल्या बहिणीला झाकून तिने स्वतःच्या अंगावर छडीचा मार सोसला. मग आपल्या रडणार्‍या बहिणीला जवळ घेऊन सिद्धेश्वरी म्हणाली, 'सियाजी महाराज तुला जे सांगत आहेत ते गाणे इतके काही अवघड नाही.' असे म्हणून सिध्देश्वरीनेसिद्धेश्वरीने तिला ती संपूर्ण सुरावट लहान-सहान बारकाव्यांसह लीलया गाऊन दाखवली. तिथे जमा झालेले सारे लोक सिद्धेश्वरीच्या गाण्याने अचंबित झाले.
 
दुसरे दिवशी सियाजी महाराजांनी राजेश्वरी देवींकडे आपल्याला सिद्धेश्वरी देवीला दत्तक द्यावे अशी विनम्र मागणी केली. सियाजी महाराज व त्यांच्या पत्नीला मूलबाळ नव्हते. अशा रीतीने सिद्धेश्वरी देवी त्या दांपत्याकडे राहू लागल्या. पुढील काळात त्या सियाजी महाराजांच्या कुटुंबाच्या सुहृद व आधार बनल्या.
७२,९१७

संपादने