"महादेव मंदिर (पाटणा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0 |
||
ओळ ४:
:समासांतर ओळ
हेमाडपंती महादेवमंदिर पाटणादेवी
मध्य रेल्वेच्या मनमाड - भुसावळ मार्गावर असलेले एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे चाळीसगाव . औरंगाबाद येथून94 किमी तर धुळ्यापासून 55 किमी अंतरावर असलेले चाळीसगाव , जळगाव औरंगाबाद व नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा तालुका आपल्या धार्मिक ऐतिहासिक व नैसर्गिक विपुलतेने परिपूर्ण आहे . चाळीसगावपासून पूर्वेला 20 किमी अंतरावर असलेले पाटणादेवी हे एक जागृत शक्तिपीठ मानले जाते .या मंदिर परिसराला पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ देखील आहे .या परिसराला यादव काळात विज्जलगड देखील म्हटले जायचे . येथून जवळच कण्हेरगड आहे . आज हा संपूर्ण परिसर शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने हिरवीगार वनराई आपले मन मोहून टाकते . पाटणादेवी मुख्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर पूर्वाभिमुख असलेले प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिर आपल्याला ऐतिहासिक काळात घेऊन जाते . या मंदिराची भव्यता नजरेत भरण्यासारखी आहे . मंदिर परिसरात अनेकठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात . त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो . यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते . या मंदिराचे निर्माण कार्य एक भव्य 10 फूट उंचीच्या ओट्यावर झाले आहे . त्याची लांबीच 100 फुटांपर्यंत आहे . नंदीगृह , सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात . छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहे . मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे . साधारणपणे 24 खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसते प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे . खांबांवरील तुळया त्यांचे जोतरे त्यावर रचलेले आयताकृती दगड , सगळं कसं अगदी जुळवून आणलंय . अतिशय कसलेल्या मुरब्बी कारागिरांच्या हातून या कलाकृतीचे निर्माण झाले आहे . प्रत्येक चौकीतील छताच्या रचनेत वैविध्य जाणवते .कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून 25 फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानामुळे मन थक्कच होते . गर्भगृहाच्या बाहेर जमिनीवर कोरलेली शंख व चक्र ही विष्णू आयुधे बघतांना मनात कोडे निर्माण होते .प्रवेशद्वाराच्या पायथ्याला मेंढ्यांची शिंगे व सिंहाचा जबडा असलेला बटबटीत डोळ्यांचा किर्तीमुख लक्ष वेधून घेतो . त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शिल्पे पुसट असल्याने नीट आकलन होत नाही . प्रवेशद्वारावर श्रीगणेश विराजमान असून सप्तमातृका कोरलेल्या आहेत .तसेच गणसेना दिसते चौकटीवर यक्ष गंधर्व किन्नर गायन वादन व नृत्य करतांना दिसतात . गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो . त्यावरील अक्षरांची ठेवण व एकसंधता पाहून कलाकारांना प्रणाम करावासा वाटतो . आज या शिलालेखाला कुठलेही संरक्षण कवच नाही . त्यामुळे पर्यटकांच्या भक्ष्यस्थानी तो पडेल की काय अशी भिती वाटते .( कुतूहल म्हणून प्रत्येकजण त्याला हात लावतोच ) म्हणून काचेच्या शोकेसमध्ये त्याला बंदिस्त केल्यास एक समृद्ध वारसा सुरक्षित राहील . काही ठिकाणी त्याचे पापुद्रे पण निघत आहेत .😢 गर्भगृहाचा आकार चंद्राकृती असून मध्यभागी असलेली शिवपिंडी मन प्रसन्न करते आत बराच अंधार असल्याने सुरुवातीला काहीच दिसत नाही .पण नंतरमात्र हळूहळू दिसायला लागते याला आतून 28 कोपरे आहेत . आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत . प्रदक्षिणा करतांना मंदिराची भव्य दिव्यता नजरेत भरते . मंदिराची भौमितिक संरचना वाखाणण्याजोगी आहे .बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना सरळ रेषेत न उभारता त्रैमितीक रचना
==चित्रदालन==
|