७२,६४५
संपादने
छोNo edit summary |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0) |
||
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात. प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे. परभणी शहराला प्रभावतीनगरी हे नाव प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते. '''प्रभावती''' या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती आणि लक्ष्मी असा होतो. परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरूप आहे.
परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये '''उरूस''' भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. उरुसामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपआपल्या आवडीनुसार या सर्व ठिकाणी जातो व त्यांच्या आनंद घेतो. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग,
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.
परभणीपासून जवळच '''गंगाखेड''' हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. त्यामुळे या गावाला संताची वारसा लाभलेले आहे तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
तसेच परभणी पासून जवळच '''पाथरी''' येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुद्धा आहे. '''ञिधारेला''' तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओॅंकारनाथ भगवान या
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
|