"रघुनाथ जगन्नाथ सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
No edit summary
ओळ २:
 
== जीवन व कार्य ==
रघुवीर सामंतांचे वडील जगन्नाथ सामंत सबजज्ज होते. [[ वाई ]] , भिवंडी, डहाणू, कल्याण, [[ धुळे ]], पुणे, ठाणे या ठिकाणी नोकरी करून शेवटी ते ठाणे येथे स्थायिक झाले. मुलगा रघुवीर याला शिक्षणासाठी त्यांनी वसतिगृहात ठेवले होते.
 
इ.स. १९३३ साली रघुवीर सामंतांनी 'पारिजात प्रकाशन' सुरू केले. त्यांची तीन वर्षांची मुलगी ज्योती अकाली निधन पावल्यामुळे तिच्या स्मृत्यर्थ सामंतांनी इ.स. १९४३ साली 'अमरज्योति वाङमय' ही प्रकाशनसंस्था सुरू केली. बालवाङमय प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. दोन्ही प्रकाशनसंस्थांतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, सांघिक अभिनयगीते, नाट्यात्मक कादंबऱ्या, ग्रामीण जीवनावरील कादंबऱ्या, नाटके, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर छोटी पुस्तके आणि विज्ञानकोशाचे दोन खंड अशी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तके इ.स. १९३३ ते १९६५ या कालावधीत सामंतांनी प्रकाशित केली.