"शिरस्त्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''शिरस्त्राण''' म्हणजे डोके सुरक्षित राखण्यासाठी वापरला जाणारा संरक्षक टोप किंवा शिरोकवच असे सामान्यपणे म्हणता येईल. [[सैनिक|सैनिकी]] शिरस्त्राणे फार पूर्वीपासून वापरात आहेत. आधुनिक काळात नागर समाजातही शिरस्त्राणे वापरली जातात. आधुनिक औद्योगिक क्षेत्रातील खाणकामगार, बांधकाम-कामगार तसेच अग्निशामकदलाचे कर्मचारी इ. व्यक्ती विशिष्ट शिरस्त्राणांचा उपयोग करतात. अवकाश-संशोधन क्षेत्रातील अंतराळवीरही विशिष्ट प्रकारचे शिरस्त्राण वापरतात. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीसदलातील पोलीस व अधिकारिवर्ग दंगली, निदर्शने, हरताळ यांसारख्या प्रसंगी शिरस्त्राणे वापरतात. दुचाक्यांचे वाहक, मोटार स्पर्धेतील स्पर्धक, त्याचप्रमाणे विविध क्रीडाप्रकारांतील व खेळातील खेळाडू हेदेखील विशिष्ट प्रकारची शिरस्त्राणे वापरतात. सैनिकी व नागरी क्षेत्रांत वापरण्यात येणारी शिरस्त्राणे, ही त्या त्या क्षेत्रातील शारीरिक व विशेषतः शिरोभागीय धोके लक्षात घेऊन तयार करण्यात येतात.
 
== सैनिकी शिरस्त्राणे ==
युद्धात शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या प्रहारापासून डोके सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर चढविलेला टोप किंवा शिरोकवच म्हणजे शिरस्त्राण होय. पूर्वीपासून वेगवेगळ्या धाटणीची अथवा आकारांची शिरस्त्राणे वापरात असल्याचे दिसून येते. इतिहासकाळातील शिरस्त्राणांचे नमुने अनेक वस्तुसंग्रहालयांमध्ये पाहवयास मिळतात. सर्वांत जुने शिरस्त्राण सुमेर संस्कृतीत (इ. स. पू. सु. १५००) आढळून आले.
 
सुरुवातीस शिरस्त्राणाचा उपयोग फक्त डोके सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू झाला पण नंतर अनुभवाने डोक्याबरोबर [[कपाळ]], कानशिले, [[डोळा|डोळे]], [[चेहरा]], [[हनुवटी]] आणि मानसुद्धा[[मान]]<nowiki/>सुद्धा सुरक्षित राखण्याची गरज निर्माण झाली. केवळ टोपीवजा असलेल्या शिरस्त्राणाच्या रचनेत त्यामुळे सुधारणा होत गेली. युरोपातील शिरस्त्राणांत ज्या सुधारणा क्रमाक्रमाने होत गेल्या, त्यांचा अभ्यास तज्ज्ञांनी केलेला आहे.
 
== ख्रिस्तपूर्व काळातील शिरस्त्राणे ==