"शिरस्त्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
 
पोलादापासून बनविलेल्या शिरस्त्राणाचा वापर पहिल्या महायुद्धापासून (१९१४–१८) सरसकट सुरू झाला. १९१४ साली फ्रेंच सैन्यात, १९१५ साली ब्रिटिश सैन्यात व त्यानंतर इतर युरोपीय व अमेरिकन सैन्यांत गोल आकाराची व हनुवटीखाली पट्ट्याने आवळून बसवता येतील, अशी शिरस्त्राणे वापरात आली. बंदुकीच्या गोळ्या अथवा तोफगोळ्यांचे तुकडे लागले, तरी ते बहुशः निसटून जावेत इतपत ते पोलाद कठीण असते आणि त्या पत्र्याची जाडी कमी असल्यामुळे ते हलकेही असते. ब्रिटन, अमेरिका, रशिया व जर्मनी यांची दुसऱ्या महायुद्धातील शिरस्त्राणे त्यांच्या त्यांच्या खास आकाराच्या बांधणीमुळे ओळखता येतात. सोव्हिएट रशियाला तोंड देण्यासाठी उभारलेल्या नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या (नाटोच्या) फौजांकरिता एकाच नमुन्याचे शिरस्त्राण तयार करण्यात आले.
 
== शिरस्त्राणांच्या आधुनिकीकरणामधील मुख्य घटक ==
 
# युद्धामध्ये सतत हालचाली चालू असल्या, तरी स्वतःचे व शत्रूचे निश्चित स्थान दाखविणारा तक्ता (इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले)
# रेडिओद्वारे संपर्क साधण्याची यंत्रणा
# शिरस्त्राण घालूनही अधिक चांगले ऐकू येऊन तो ऐकलेला आवाज कुठून अथवा कोणत्या दिशेने येत आहे, हे कळण्याची यंत्रणा
# लेसर किरणांपासून व इतर दुखापतींपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी बसविलेल्या झडपा
# अंधाऱ्या रात्रीसुद्धा टेहळणी करण्याइतपत बघता येईल असा अवरक्त (इन्फ्रारेड) चश्मा (टेहळणी करता येईल अशी क्षमता नेत्रपटलाला देणारा चश्मा)
# शिरस्त्राणावर बसविता येईल, असा संवेदनशील कॅमेरा.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील सतत होत असलेल्या प्रगतीमुळे भावी काळात सर्व क्षेत्रांत, विशेषतः नौदल आणि हवाई दलांतदेखील शिरस्त्राणांत आमूलाग्र बदल संभवतात. उच्च न्यायालयाने शिरस्त्राण वापरण्याचा आदेश दिला असून, महाराष्ट्र शासनाने त्याची कार्यवाही करण्याचा निर्धार केला आहे.