"आल्बेर्तो फुहिमोरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
ओळ २०:
| तळटीपा =
}}
'''आल्बेर्तो फुहिमोरी फुहिमोरी''' ({{lang-es|Alberto Fujimori Fujimori}}; जन्म: २८ जुलै १९३८) हा [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेमधील]] [[पेरू]] देशाचा माजी [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]] आहे. जपानी वंशाचा असलेला फुहिमोरी १९९० ते २००० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्याला पेरूची अर्थव्यवस्था सुधारण्याचे व पेरूमधील [[माओवाद]]ी अतिरेकी संघटनेला पराभूत करण्याचे श्रेय दिले जाते. त्याचबरोबर फुहिमोरीवर [[हुकुमशाही]] गाजवण्याचे व [[मानवी हक्क]]ांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली करण्याचे आरोप देखील झाले.
 
ह्या आरोपांवरून खटला भरला जाण्याच्या भितीने फुहिमोरीने पेरूमधून पळ काढला व तो [[जपान]]मध्ये दाखल झाला. तेथूनच त्याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला परंतु पेरूच्या संसदेने तो नामंजूर करून फुहिमोरीला निलंबित करून त्याच्याविरुद्ध अटकपत्र जाहीर केले. २००५ साली फुहिमोरीला [[चिली]] देशाच्या [[सान्तियागो]] शहरामध्ये अटक करण्यात आले. २००९ साली पेरूच्या सर्वोच्च न्यायालयाने फुहिमोरीला भ्रष्टाचार, कत्तल, मारहाण, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावली.
 
== बाह्य दुवे ==