"प्रकाश नारायण संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २४:
}}
 
'''प्रकाश नारायण संत''' (जन्म : [[जून १६]],[[इ.स. १९३७|१९३७]] - - [[जुलै १५]],[[इ.स. २००३|२००३]]) हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. 'लंपन' या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवूनठेऊन त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक (Semi-Autobiographical) कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात.
 
==अल्प चरित्र==
प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी [[बेळगाव]] येथे झाला. त्यांचे वडील [[नारायण संत]] हे उत्तम ललितलेखक होते आणि आई [[इंदिरा संत]] या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
पुणे येथील [[फर्गसन महाविद्यालय| फर्ग्युसन महाविद्यालयातून]] भूरचनाशास्त्रात बी.एस्‌सी. केल्यानंतर संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस्‌सी. व पीएच.डी. केले. यानंतर ते [[कर्‍हाडकऱ्हाड]] येथील 'यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स'मध्ये सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) {{मराठी शब्द सुचवा}} म्हणून [[इ.स. १९६१|१९६१]] साली रुजू झाले. १९९७ साली ते निवृत्त झाले. दुर्दैवाने १५ जुलै, २००३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.
 
==लेखन==
प्रकाश संत यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवातसुरूवात केली. विशीत असतांनाच ते कथा लिहू लागले. [[सत्यकथा]] सारख्या दर्जेदार मासिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या होत्या व त्यांना मान्यवरांची दादही मिळाली होती. मात्र १९६३ साली त्यांनी आपले लेखन अचानक थांबविले. अनेक वर्षांनंतर १९९० साली त्यांनी परत कथालेखनास सुरुवातसुरूवात केली व हे लेखन त्यांच्या मृत्यूपर्यंत अविरत चालू होते. 'लंपन'च्या आयुष्यातील तरुणपणाच्या दिवसांवर एक कादंबरी लिहिण्याचा संकल्प त्यांनी केला होता. पण तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा कथासंग्रह [[झुंबर (कथासंग्रह)|झुंबर]] प्रकाशित झाला. प्रकाश संत हे उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती.
 
==प्रकाशित पुस्तके==