"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''लहु राघोजी साळवे''' (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते '''लहुजी वस्ताद''' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ल्याच्या]] पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका [[मातंग ]] कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदाएकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.
 
[[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ''''राऊत''' ' या पदवीने गौरविले होते.