"प्रो कबड्डी लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४४:
;[[प्रो कबड्डी लीग, २०१६ (जानेवारी)|३रा हंगाम (पटणा पायरेट्स)]]
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी ३र्‍या हंगामाच्या दोन आवृत्त्या होत्या. स्टार इंडियाचे सीईओ, संजय गुप्ता, यांनी पुष्टी केली की स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीला, प्रो कबड्डी हा प्रत्येकी ५ आठवड्यांचा आणि वर्षातून दोन आवृत्त्या असणारा असा एकूण १० आठवड्यांचा कार्यक्रम घडवायचा आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०१६ मध्ये एकदा आणि जून-जुलै २०१६ मध्ये एकदा स्पर्धा खेळवण्याचा विचार आहे. त्यात ८ संघ देखील होते. दिल्लीत झालेल्या फायनलमध्ये [[पटणा पायरेट्स]]ने [[यू मुम्बा]]चा ३ गुणांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. [[पुणेरी पलटण]] संघ या मोसमात तिसऱ्या स्थानावर राहिला.
 
;[[प्रो कबड्डी लीग, २०१६ (जून)|४था हंगाम (पटणा पायरेट्स)]]
स्पर्धेचा चौथा मोसम २५ जून ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत पार पडला, ज्यामध्ये विद्यमान आठ संघ सहभागी झाले होते. [[पाटणा पायरेट्स]]ने अंतिम सामन्यात [[जयपूर पिंक पँथर्स]]चा पराभव केला. सीझन ४ मध्ये पहिली व्यावसायिक महिला कबड्डी लीग, महिला कबड्डी चॅलेंजचे (WKC) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या मोसमात आइस दिवाज्, फायर बर्ड्स आणि स्टॉर्म क्विन्स ह्या तीन संघांदरम्यान विजेतेपदाचा थरार रंगला. [[हैदराबाद]]मध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीसह आयोजित झालेल्या अंतिम फेरीत, स्टॉर्म क्वीन्सने फायर बर्ड्सचा २४-२३ असा पराभव केला.
 
==लीग संघटना==