"श्रीधर महादेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस using AWB
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ ३०:
'''श्रीधर महादेव जोशी''', अर्थात '''एस.एम. जोशी''', (जन्म : १२ नोव्हेंबर १९०४; मृत्य : १ एप्रिल १९८९) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक]], [[समाजवाद|समाजवादी]] कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी [[संयुक्त समाजवादी पक्ष|संयुक्त समाजवादी पक्षाचे]] सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील नि:स्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते.
 
एस. एम. जोशींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील गोळप होय. एकत्रित असलेले मोठे कुटुंब व एकटे वडील कमवते अशा स्थितीत जेमतेम भागणाऱ्या घरात त्यांच्या आयुष्याची सुरुवातसुरूवात झाली आणि पुढे ही स्थिती आणखीनच बिघडत गेली. १९१५ साली वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले.
 
एसेएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एसएम जोशींनी चालूच ठेवले. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते २ऱ्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले..
ओळ ४८:
१९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. आधी [[महात्मा गांधी]] यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल १९३० साली एक वर्षाचा आणि नंतर 'राॅय दिना'च्या दिवशी केलेल्या भाषणाबद्दल दोन वर्षांचा असा एकूण सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. साबरमती, नाशिक व येरवडा येथील तुरुंगांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना समृद्ध करणारा साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादाचे संस्कार देणे, त्यासाठी शिबिरे-संमेलने-मेळावे भरवणे, कलापथके स्थापन करून त्याद्वारे अस्पृश्यताविरोधी प्रचार, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा अशी अनेक रचनात्मक कामे त्यांनी केली. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, पु.ल.देशपांडे, निळू फुले, राम नगरकर, स्मिता पाटील इत्यादी दिग्गज कलावंत त्या-त्या काळात काम करत होते. यामागे प्रमुख प्रेरणा एस.एम. जोशी यांचीच होती. स्वातंत्र्य आंदोलनात काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही कार्य केले.
 
एसएम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एसएम यांची हजेरी असे.
 
 
 
==प्रकाशित साहित्य==
Line ६६ ⟶ ६४:
 
==बाह्य दुवे==
 
 
 
https://www.marathisrushti.com/articles/s-m-joshi/