"ऑपरेशन ब्लू स्टार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू (3) using AWB
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ २२:
ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेग सिंह यांच्याकडे होते. (शाबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या युद्धात त्यांनी बांगलादेश मुक्तीबाहिनी च्या सभासदांना प्रशिक्षित केले होते. त्यांनी भा‍रतीय सैन्यात अतिविशिष्ठ सेवा पदक व परमविशिष्ठ सेवा पदक मिळाले होते.)
 
आपल्या ऑपरेशन ब्लू स्टार: अ ट्रु स्टोरी या पुस्तकात मेजर जनरल बरार म्हणतात. ३० मे रोजी मेरठ मधुन त्यांना तातडीने चंदिगढ येथे पोहचण्याचा संदेश मिळाला. तेथेच त्यांना संभाव्य कारवाईचे आदेश व नेतृत्व देण्यात आले. पुढे सांगण्यात आले, परिस्थिती फार बिघडली असुन येत्या २/४ दिवसात खलिस्तानची घोषणा होऊ शकते. यानंतर पंजाब पोलिस दल खलिस्तानच्या स्वाधीन होईल. यानंतर दिल्ली व हरियाणातील शीख पंजाब कडे कूच करुनकरून, हिंदुं पंजाबातुन बाहेर येतील. १९४७ प्रमाणे दंगली उसळन्याची शक्यता आहे. याचवेळी पाकिस्तानही सीमा पार करून समर्थन देऊ शकतो व बांगलादेश निर्मिती सारखा प्रकार भारतातही घडवला जाऊ शकेल.
 
३ जुन पासुनच भारतीय सेनेने सुवर्ण मंदिराच्या परिसरात मोर्चे बांधणी सुरू केली होती. आजुबाजुच्या काही इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशिनगन्स बसवल्या गेल्या. त्याचबरोबर ३ जुन पासुन सुवर्ण मंदिरा सभोवतालच्या परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली. ३ जुन पासुन ५ जुन पर्यंत अधुन मधुन काही फैरी दोन्ही बाजुंकडुन झाडण्यात आल्या. सुवर्ण मंदिरा जवळील इतर इमारतीतील दहशतवाद्यांनी फारसा प्रतिकार न करता समर्पण केले. मुख्य कारवाईस सुरवात सुवर्ण मंदिरात ५ जुनला रात्री १० वाजेच्या सुमारास झाली.