"इल्या रेपिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ २५:
}}
 
'''इल्या रेपिन''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Илья́ Ефи́мович Ре́пин) (जीवनकाल:[[ऑगस्ट ५]], [[इ.स. १८४४|१८४४]]:[[चुगुएव्ह]], [[युक्रेन]] - [[सप्टेंबर २९]], [[इ.स. १९३०|१९३०]]) हा नामवंत रशियन चित्रकार होता. रेपिनची चित्रे वास्तववादी ढंगातील असून त्यात तत्कालीन रशियन समाजव्यवस्थेचे, घडामोडींचे चित्रण दिसते.
 
== जीवन ==
इल्या रेपिनचा जन्म [[ऑगस्ट ५]], [[इ.स. १८४४|१८४४]] रोजी [[स्लोबोदा युक्रेन]] परिसरातील [[खार्कोव्ह]] शहरानजीक 'चुगुएव्ह' नावाच्या गावात झाला. तरूणवयात रेपिनने 'बुनाकोव्ह' नावाच्या स्थानिक चित्रकाराकडे उमेदवारी करत चित्रकलेचा, विशेषकरून व्यक्तिचित्रणाचा अभ्यास केला. [[इ.स. १८६६|१८६६]] मध्ये तो [[सेंट पीटर्सबर्ग|सेंट पीटर्सबर्गला]] गेला व त्याला तेथील '[[इंपिरियल अकॅडमी ऑफ आर्ट्स]]' या सुविख्यात कलाशिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाला. [[इ.स. १८७३|१८७३]] - [[इ.स. १८७६|१८७६]] या कालखंडात संस्थेने दिलेल्या भत्त्यावर त्याने [[इटली]], [[पॅरिस]] या ठिकाणांचा अभ्यासदौरा केला. पॅरिसमध्ये असताना तिथे नव्याने सुरुसुरू झालेल्या [[दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैली|दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीशी]]('इंप्रेशनिझम'शी) त्याची ओळख झाली. दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीतील प्रकाशाच्या चित्रणाचा प्रभाव पडला तरीही रेपिनची शैली मात्र युरोपातील वास्तववादी चित्रपरंपरेशी नाते सांगणारीच राहिली. आपल्या चित्रांमधून रेपिनने सर्वसामान्य माणसांच्या - विशेषत्वाने ग्रामीण लोकांच्या - भावनांचे, क्रिया-प्रतिक्रियांचे चित्रण केले. याखेरीज उत्तरायुष्यात त्याने रंगविलेली रशियन विद्वज्जनांची, अधिकाऱ्यांची, रशियन राजघराण्यातील व्यक्तींची चित्रेही उपलब्ध आहेत. [[मूलद्रव्य|मूलद्रव्यांची]] पहिली [[आवर्त सारणी]] तयार करणारा रशियन रसायनशास्त्रज्ञ [[दिमित्री मेंडेलीव]] याचेही चित्र इल्या रेपिनने चितारलेले आहे.
 
=== पेरेद्विझ्निकी असोसिएशन ===