"आन्श्लुस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: एकत्रीत → एकत्रित using AWB
ओळ २:
'''आन्श्लुस''' ({{lang-de|Anschluss}}, मराठी अर्थ: ऑस्ट्रियाचे विलिनीकरण) ही [[ऑस्ट्रिया]] देशाच्या इतिहासातील एक महत्त्त्वपूर्ण घटना होती. १२ मार्च १९३८ रोजी [[ॲडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने संपूर्ण ऑस्ट्रिया देशावर कब्जा मिळवला व ऑस्ट्रियाचा पूर्ण भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. १९३८ ते १९४५ दरम्यान एकत्रित राहिल्यानंतर [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] जर्मनीच्या पराभवासोबतच आन्श्लुसदेखील संपुष्टात आले व ऑस्ट्रिया देश पुन्हा स्वतंत्र व सार्वभौम बनला.
 
जर्मनी व ऑस्ट्रिया ह्या देशांत [[जर्मन भाषा|जर्मन भाषिक]], मिळत्याजुळत्या वंशाचे व संस्कृतीचे लोक प्रामुख्याने असल्यामुळे एकत्रीकरणाचे वारे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाहत होते. १८७१ साली प्रामुख्याने [[प्रशियाचे राजतंत्र|प्रशियाच्या]] प्रभावाखाली घडलेल्या [[जर्मनीचे एकत्रीकरण|जर्मनीच्या एकत्रीकरणामध्ये]] ऑस्ट्रिया वगळला गेला होता. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाअखेरीस]] [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] राष्ट्र कोलमडले व [[पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक|पहिल्या ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा]] उदय झाला. ह्यादरम्यानच ऑस्ट्रियाला जर्मनीसोबत एकत्रीतएकत्रित होण्यात रस होता परंतु [[व्हर्सायचा तह|वर्सायच्या तहातील]] अटींमुळे हे अशक्य झाले होते. परंतु बहुसंख्य ऑस्ट्रियन जनतेला एकत्रीकरण हवे होते. [[वायमार प्रजासत्ताक]] व ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाच्या संविधानातच एकत्रीकरणाचा उद्देश सामील केला गेला होता. १९३०च्या पूर्वार्धात देखील ऑस्ट्रियामध्ये ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा कायम राहिला होता. जन्माने ऑस्ट्रियन असलेल्या ॲडॉल्फ हिटलरच्या मनात लहानपणापासुनच एकत्रित ऑस्ट्रिया-जर्मनीची संकल्पना रुजली होती. त्याच्या १९२५ सालच्या [[माईन काम्फ]] ह्या आत्मचरित्रातदेखील त्याने एकत्र जर्मन राष्ट्र निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ह्या पार्श्वभूमीवर १९३२ साली हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आल्यानंतर त्याने एकत्रीकरणाचे जोरदार प्रयत्न चालू केले. परंतु हिटलरच्या उदयामुळे घाबरलेल्या ऑस्ट्रियन सरकारने जर्मनीसोबतचे आर्थिक संबंध कमी करून एकत्रीकरणाविरुद्ध प्रचार चालू केला.
 
ह्याच काळात ऑस्ट्रियामध्ये सत्तेवर असलेला ख्रिस्ती समाजवादी पक्ष एकत्रीकरणाच्या विरोधात होता. तत्कालीन ऑस्ट्रियन चान्सेलर [[एंगेलबर्ट डॉलफस]] ह्याने ऑस्ट्रियन संसद बरखास्त केली व ऑस्ट्रियन नाझी पक्षावर बंदी घातली. परंतु ऑस्ट्रियन नाझी पक्षाची लोकप्रियता व प्रभाव वाढतच राहिला व त्याने ऑस्ट्रियन सरकारविरुद्ध अतिरेकी हल्ले चालू ठेवले. १९३४ सालच्या डॉलफसच्या हत्त्येनंतर सत्तेवर आलेल्या कर्ट शुश्निगने डॉलफसची नाझी-विरोधी धोरणे कायम ठेवली. ह्यामुळे खवळून उठलेल्या नाझी जर्मनीने ऑस्ट्रियावर संपूर्ण बहिष्कार टाकला ज्याचा परिणाम म्हणून लवकरच ऑस्ट्रियाची अर्थव्यवस्था घायकुतीला आली. अखेर ११ जुलै १९३६ रोजी शुश्निगने जर्मन राजदूत [[फ्रांत्स फॉन पापेन]]सोबत करार केल्या ज्यामध्ये त्याने कैद केलेल्या नाझी पुढाऱ्यांची सुटका केली व नाझी पक्षाला अतिरेकी हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. परंतु हिटलरला हा करार पटला नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/आन्श्लुस" पासून हुडकले