"नुआखै उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
[[भाद्रपद]] महिन्याच्या पंचमी तिथीला म्हणजेच [[गणेश चतुर्थी]] च्या दुस-या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अन्नाशी संबंधित असा हा उत्सव [[झारखंड]] आणि ओरिसा येथील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.नव्या पिकाबद्दल शेतक-याच्या मनात आशा निर्माण करणारा असा हा सण आहे. लगन म्हणजे दिवसाच्या एका विशिष्ट वेळेला या सणाची पूजा केली जाते. यात प्रथम ग्रामदेवता किंवा स्थानदेवतेचे पूजन व स्मरण केले जाते.
सणाच्या आधी घराची आणि गोठ्याची स्वछता करणे, नव्या कपड्यांची खरेदी करणे, [[झोटी चीता]] नावाची वैशिष्ट्यपूर्ण राबगोली अंगणात, दारात आकधने अशी पूर्वतयारी केली जाते. एकमेकांना भेटवस्तू देणे, समूहातील वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घेणे, एकत्रितपणे उत्सवाची मजा घेणे हे सर्व संध्याकाळच्या वेळेला केले जाते.<ref name=":0" />
पीठा नावाचा गोड पदार्थ यासाठी तयार केला जातो. चकली, मग बारा, खीर यासारखे पदार्थही केले जातात. मटण आणि तत्सम पदार्थ करून त्यांचा नव्या ताज्या भातासह खाण्याचा आनंद घेतला जातो. ढोल, ताशा इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या तालावर संबळपुरी लोकगीते गात लोकनृत्य केले जाते.
 
== संदर्भ ==