"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
* योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले.
* भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईमुळे त्यांना [[विसोबा खेचर]] या गुरूंचा लाभ झाला.
*नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या मुक्ताबाई ह्या पहिल्याच स्त्री-सद्गुरु होत्या.
 
== जीवनपट ==
Line ३५ ⟶ ३६:
 
=== संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई ===
ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरुबंधू-भगिनी असे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या लहानशा प्रकरणग्रंथामध्ये त्याचे दर्शन घडते. या ग्रंथाचे स्वरूप असे आहे की, येथे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना साधनेसंबंधी विविध प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेश्वरांनी येथे मुक्ताबाईस गुरुप्रणित सोऽहम् साधनेसंबंधी मार्गदर्शन केले आहे. सोऽहम् संबंधी सखोल विवेचन झाल्यावर ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणतात, <nowiki>''</nowiki>यापरता नाही उपदेश आता ।।<nowiki>''</nowiki> ज्ञानेश्वरांना सोऽहम् साधनेसंबंधी जे ज्ञात होते ते सर्व त्यांनी मुक्ताबाईंना सांगितले असावे, असे वरील वाक्यावरून लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या शंकानिरसनामुळे मुक्ताबाईंचेही समाधान झाले. तो सर्व भाग त्यांनी स्वत: आत्मसात केला, त्यातून त्यांची अवस्था बदलली. त्या उच्चदशेस जाऊन पोहोचल्या. त्यांच्यातील हा बदल ज्ञानेश्वरांच्याही लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी मुक्ताबाईंना नि:शंक शब्दामध्ये एक प्रशस्तिपत्रही दिले - ते म्हणाले, <nowiki>''</nowiki>आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ।।<nowiki>''</nowiki> <ref>मराठी संत-साहित्यातील नाथ-प्रतिपादित सोहम साधना - एक अभ्यास - (प्रबंध), डॉ.केतकी मोडक </ref>
 
=== संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ===