"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छोNo edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ३८:
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी सन १८७२ ते १८७७ या सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ |१८७९]] या सालांदरम्यान त्यांनी [[रत्‍नागिरी|रत्‍नागिरीतील]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
 
[[इ.स. १८७४|१८७४]] साली चिपळूणकरांनी ''निबंधमाला'' ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सत्तेच्या]] अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी इ.स. १८७८मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ''काव्येतिहास संग्रह'' हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. इ.स. १८७५मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी ''किताबखाना'' नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून,१८८० साली त्यांनी [[बाळ गंगाधर टिळक]] व [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.१८८१ सालच्या जानेवारीत त्यांनी ''[[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]'' हे मराठी व ''[[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]]'' हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात [[कालिदास]], भवभूती, बाण, सुबंधु व [[दंडी]] या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.<ref>{{संदर्भसंकेतस्थळ हवास्रोत|url=https://mr.phondia.com/vishnushastri-krushnashastri-chiplunkar-information-in-marathi/|title=विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर - संपूर्ण माहिती मराठी|date=2021-12-18|website=Marathi Phondia|language=mr-IN|access-date=2021-12-19}}</ref>
 
== सामाजिक कार्य ==