"ठिपकेदार मुनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ref
ओळ ९:
'''ठिपकेदार मुनिया''' हा भारतात आढळणारा सामान्य पक्षी आहे.
==वर्णन==
ठिपकेदार मिनिया हा साधारण १० सें. मी. आकारमानाचा, [[चिमणी]]सारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात. {{संदर्भ हवा}}
== आढळस्थान ==
[[राजस्थान]], [[पंजाब]], [[हिमालय|हिमालयाचा काही]] भाग वगळता (हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुनिया सापडतात) संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत.
ओळ १६:
ठिपकेदार मुनिया या मुख्यत्वे करून शेतातील दाणे, धान्य, छोटे किडे यावर आपली उपजीविका करतात.
== विणीचा हंगाम ==
जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या विणीचा काळ असून त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. एखादा धोका जाणवला की वेडा राघू 'टीर! टीर! टीर!' असा किणकिणणारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात आणि 'पटी! पटी!' अशा मंजूळ आवाज करत एखाद्या झुडपात लपून बसतात. म्हणजे आजूबाजूला एखादा रखवाली करणारा वेडा राघू असणे हे मुनियाच्या फायद्याचे असते. कदाचित जमिनीवर चरणाऱ्या मुनियांच्या हालचालीमुळे उडणारे किडे वेड्या राघूला टिपता येत असावेत.{{संदर्भ हवा}}
==चित्रदालन==
<gallery>