"दिवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP पक्ष्याच्या आकाराचा तेलाचा दिवा छायाचित्र जोडले
छायाचित्र जोडले
ओळ ३:
==दिवे आणि संस्कृती==
[[File:Indian - Hanging Oil Lantern in the Shape of a Bird - Walters 54448.jpg|thumb|पक्ष्याच्या आकाराचा तेलाचा दिवा]]
[[चित्र:Panati 1.jpg|thumb|दिवाळीतील पणत्या]]
दिव्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. खाद्यतेल वापरून प्रकाशमान होणारा मातीची पणती हा भारतातील दिवा अधिक प्रकाश देणार्‍या इतर साधनांच्या उपलब्धतेनंतर कमी वापरला जाऊ लागला, तरी त्याचे परंपरेतील स्थान अबाधित राहिले आहे. देवळे, देव्हारे, तुळशी वृंदावने, स्वागत कमानी आणि दरवाजांचे कोनाडे वगैरे ठिकाणी पणत्या लावल्या जातात. सायंकाळच्या वेळी दिवा लावल्यानंतर दिव्यास नमस्कार करण्याची प्रथाही आहे. तसेच महाराष्ट्रात घरोघरी सायंकाळी म्हणावयाच्या शुंभकरोति प्रार्थनेत सुद्धा दिव्याचा उल्लेख असतो. पणत्यांचा उपयोग आरती तसेच ओवाळताना सुद्धा केला जातो. त्याकरिता बर्‍याचदा पिठाच्या पणत्या वापरण्याची परंपरा आहे. ठरावीक सणाच्या दिवशी पणत्या नदी अथवा तलावात सोडण्याची प्रथा आहे. त्याशिवाय दिपावली सणाच्या वेळी पणत्या ओळीने अथवा विशिष्ट रचनेत लावून पारंपारिक रोषणाई केली जाते .
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवा" पासून हुडकले