"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४४:
प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.
==योजना,संस्था,निर्मिती,स्थापना==
• कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, (अकोला (१९६९), परभणी, राहुरी (१९६८),
• औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी)
• मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४
• महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७
• नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१
• औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर
• कापूस एकाधिकार योजना (१९७१)
• विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा
• हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=वसंतराव नाईक : जन्मशताब्दी|publisher=लोकराज्य मासिक, महाराष्ट्र शासन|year=२०१२|location=मुंबई}}</ref>
 
 
 
==वसंतराव नाईक यांच्यावरील चित्रपट==