"सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-52/11038-2013-03-06-09-04-36 पासून नकल डकव.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
 
पारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड,फुंकणी, इ. हत्यारे व बागेश्वरी वापरली जात असत.
 
सोनार हें नांव धंदेवाचक असल्यामुळें या नांवाखालीं विविध वर्णांचे व धर्मांचे लोक येतात; उदा. यांत पांचाळ व दैवज्ञांसारखे ब्राह्मण व अहिर व लाडसोनारांसारखे क्षत्रिय येतात. कांहीं मुसलमान, जैन व शीखहि आपल्याला सोनार जातीचे म्हणवितात.{{संदर्भ हवा}}
 
एकंदर हिंदुस्थानांत १२॥ लाखांवर सोनार जातीचे लोक आहेत; पैकीं सुमारें १२ लक्ष हिंदु आहेत. ४०००० मुसलमान आहेत, व बाकीचें शीख (२८०००) व जैन (६०) आहेत. सर्वांत जास्त संख्या संयुक्तप्रांतांत सांपडते (२॥ लाख) व त्या खालोखाल बिहार-ओरिसांत (२ लाख) नंतर मुंबई इलाख्यांत (१३/४ लाख), व यापेक्षां कमी पंजाबांत आहेत.{{संदर्भ हवा}}
 
मुंबई इलाख्यांत दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण, सोनार यांसारख्या नांवाखालीं सोनारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या सुमारें ९० हजार आहे. गुजराथेंत सोनारांनां सोनी म्हणतात. त्यांची तेथें संख्या सुमारें २० हजार आहे. मुंबई प्रांतांत सोनारांची व्याप्ति दक्षिण, कोंकण व कर्नाटक या सर्व प्रांतभर आहे. कानड्यांत त्यांनां अक्साळी म्हणतात. दुसर्या (सुतार, लोहार वगैरे) कारागिरांप्रमाणें हेहि आपली उत्पत्ति विश्वकर्म्यापासून सांगतात. हे स्वतःला पांचाळ म्हणवितात. यांच्यापैकीं कांहीं सोनार आपणांस ब्राह्मण म्हणवितात. सोनार समाजांत उच्च दर्जाचें म्हणजे दक्षिणेतले कानडे सोनार व विश्वकर्मा मुखोद्भूत पांचाल समजतात. परंतु देवांग व कोंकणी सोनार हेहि आपणाला ब्राह्मणासारख्या श्रेष्ठ दर्जाचे समजत असून आपणांस दैवज्ञ सोनार व पांचाल सोनार म्हणवून घेतात. वैश्य सोनारांचा एक चौथा वर्ग उत्पन्न झाला असून वरील जातींत त्याचा समावेश होतो. कांहीं ठिकाणीं अहीर सोनार अशीच आपल्या जातीची श्रेष्ठता प्रस्थापित करतात. पण काहीं ठिकाणचे अहीर सोनार जातीसंबंधीं महत्त्वाकांक्षां दूर ठेवून गोत्र जुमानीत नाहींत किंवा जानवेंहि घालीत नाहींत. लाड सोनार क्षत्रिय येतात. अहीर व लाड सोनारांच्या लग्नप्रसंगीं देवक पंचपल्लवीचें असतें ही गोष्ट त्यांच्या ब्राह्मण्याच्या आड येईल. शीलवंत व इतर सोनार हे यांच्याहूनहि वेगळे [मुं. से. रि. १९११]{{संदर्भ हवा}}
 
या माहितीवरून असें दिसून येईल कीं ज्याला सोनारकीचा धंदा करण्यापुरतें चातुर्य असतें तो आपला सोनारकीचा धंदा सुरू करतो; मग त्याची जात कोणतीहि असो. या योगानें मूळच्या अस्सल जातींत फार कमीपणा यावयाला लागला.
 
तथापि अस्सल सोनार आचारविचारानें फार शुद्ध रहात असून जवळ जवळ बाह्यदृष्ट्या ब्राह्मणांसारखे दिसतात. यामुळें ब्राह्मणांची व त्यांची स्पर्धा सुरू झाली व पेशव्यांच्या अमदानींत सोनारांनी जानवें घालूं नये व थाटमाटानें लग्नेंहि करूं नयेंत म्हणून निर्बंध घातला होता. त्यावेळेस सोनार वरघोडा पाहणें वाईट समजलें जात असे. सोनारांनीं लग्नांत नवर्यामुलावर अबदागीर धरूं नये अगर पालखींत बसवून त्याची मिरवणूक काढूं नये अशा प्रकारचेंहि निर्बंध होतेसें दिसतें.{{संदर्भ हवा}}
 
कानडा जिल्ह्यांत सोनार शब्दाचा तिरस्कार इतका वाढला होता कीं, भोळे आस्तिक लोक रात्री 'सोनार' हीं अक्षरेंहि उच्चारीत नसत, व आपल्या पूजाअर्चेच्या वेळीं सोनारांच्या हत्याराचा 'ट ट' शब्द शक्य तितक्या रीतीनें टाळण्याची सावधगिरी घेत. अद्यापपर्यंत कानड्यांत कोणत्याहि जातीचा हलका देखील मनुष्य सोनाराच्या घरी पाणी पीत नाहीं अगर रात्रीची तेथें विश्रांति घेत नाहीं. सोनारावर एवढी इतराजी असल्याचें कारण बहुधा दुसरें कांहीं एक नसून सोन्यासारख्या मौल्यवान धातूची ते चोरी करतात हें होय.
 
सोनारांचा पिढीजाद धंदा म्हणजे सोन्यारूप्याचें दागिने करणें व जडियेजवाहीर काम करणें हें होय. आतां कांहीं शेतकी तर कांहीं सरकारी नोकरीहि करतात. पूर्वी नाण्यांची पारख करण्याकरितां सोनाराची आवश्यकता असे त्या सोनारांनां पोतदार ही संज्ञा असून बलुतेदारांत त्यांचा समावेश केला जाई.
 
सोनारांत पुढील १३ वर्ग आहेत:— (१) अहीर किंवा खानदेशी, (२) अझर, (३) देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाल सोनार; (४) देशी अथवा मराठे सोनार; (५) कडू, दासीपुत्र अथवा विदुर; (६) कन्नड; (७) कोंकणी अथवा दैवज्ञ;(८) लाड; (९) माळवी; (१०) परदेशी; (११) साड; (१२) शीलवंत; (१३) वैश्य अथवा जैन.{{संदर्भ हवा}}
 
शासन दरबारी इतर मागासवर्गीय ( obc ) मधील १५४ नंबरची जात.
 
या वर्गांत आपसांत रोटी-बेटीव्यवहार होत नाहींत. रत्नागिरीच्या कोंकणी सोनारांत टांकसाळे व अंगसाळे हे दोन भेद असून अंगसाळ्यांहून टांकसाळे श्रेष्ठ समजले जातात. मराठी राज्यांत टांकसाळ्यांकडे नाणें पाडण्याचें काम असे व अंगसाळ्यांकडे नाण्याची पारख असे.
 
सोनारांपैकीं जे आपणांस ब्राह्मण म्हणवीत त्यांनीं ब्राह्मणांच्या गोत्रपद्धतीचें अनुकरण केलें. इतर सोनारांच्या जाती त्यांच्या आडनांवांवरून प्रचारांत आल्या. देशी, अहीर, माळवी, लाड, व कडू सोनारांत देवक पंचपल्लवी असून शिवाय सांडस व फुंकणी हेहि जिन्नस असतात. देशी, माळवी, अहीर, लाड व कडू जातींत पुनर्विवाह मान्य आहे. इतर सोनार पुनर्विवाह करीत नाहींत एवढेंच नाहींतर विधवा केशवपन करतात.
 
ब्राह्मणसोनार खेरीजकरून इतर सोनारांत घटस्फोट होतो. लग्न होण्याच्यापूर्वी मुलाची मुंज करून जानवें घालण्याचा परिपाठ आहे व मुलीचें लग्न ती वयांत येण्यापूर्वी उरकून घेतात.
 
दैवज्ञ, कन्नड व वैश्य खेरीज करून इतर सोनार मांस खातात व दारू पितात. कन्नड सोनार दैवज्ञ सोनारांच्या घरीं अन्न घेत नाहींत, फक्त ब्राह्मणांच्या हातचें अन्न खातात.
 
सोनारांचें अन्न मराठे, माळी, कुंभार, न्हावी व धनगर लोक खात नाहींत. कानडा जिल्ह्यांतलें सोनार कोणाच्या हातचे खात नाहींत, तर कोणतीहि हलकी जात सोनाराच्या हातच्या अन्नाला स्पर्श करीत नाहीं. कांहीं ठिकाणीं-विशेषेंकरून मुंबईत-सोनारांचे उपाध्याय सोनार असतात. यांच्यांत पंचायती आहेत. दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण हे लेख पहा. [मुंबई सेन्सस रिपोर्ट, ८ (१९११); रसेल – हिरालाल; मुं. गॅ. १२, इत्यादि.]
 
अत्यंत प्राचीन व सनातन असणारा हा समाज, विविध ग्रंथात, पुराणात याचा उल्लेख सापडतो. अनेक संत महात्मे या समाजात होऊन गेले. अत्यंत शांत प्रिय व कर्मनिष्ठ समाज म्हणून ओळख आहे. सोनार समाजात अनेक उप पोटशाखा आहेत उदा. दैवज्ञ, अहिर, लाड, वैश्य, पांचाळ ( पाच गोत्रांचा ) , विश्वब्राह्मण, बंजारा, टाक, मारवाडी अस्या १२५ गोत्र व विविध पोटजाती आहेत. पुर्वी हा समाज एकच होता आज ही एकमेकांची गोत्र एकमेकांशी जुळतात. दैवज्ञातील गोत्रे पांचाळ, लाड, अहिर मध्ये सापडतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनार" पासून हुडकले