"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५३६ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
छो
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
२. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. व्यापाराच्या निमित्ताने 'रानोमाळ भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे, असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह.
 
बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की, बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याच्या जवळ असल्याचे दिसून येते. त्यांचे डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोर-बंजारांकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा परंपरागत लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून 'बनचर' या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही. परंतु राजपुतान्यातील अस्थिरतेमुळे क्षत्रिय समुह वेगवेगळ्या प्रदेशात रानावनात राहू लागली, यालाच पुढे बंजारा हे नाव धारण केल्याचेही संदर्भ इतिहासात सापडतो. गौर बंजारा समाजात राठोड, पवार, चव्हाण आणि जाधव हे प्रमुख कुल मानले जातात. यांची वंशावळी व गोत्र राजस्थानमधील क्षत्रियाशी बरीचशी मिळतेजुळते आहे. आजही त्यांच्या नावात अधिकतेने 'सिंह किंवा 'सिंग' असे नावापुढे लावले जाते. उदा. फुलसिंग, लाल सिंग, चतुरसिंह, हरीसिंघ वगैरे, तसेच गोत्र देखील राणावत, रणसोत, रामावत, सांगावत , झरपाल, बिंजरावत, मेघावत, खेतावत, धेगावत, गोरावत, आमगोत, पालतीया , मालोत, पंवार, सांगावत, उधावत, धारावत, लोकावत, जाठरोत वगैरे. कुलदैवत महाकाली, जगदंबा असुन यालाच महागौरी असे म्हणतात. महागौरी हे गौर वंश सुचक दिसून येते. गौर बंजारा समाजात सातीभवानीला पुजल्या जाते. भगवान शंकराचा वाहन असलेल्या नंदीची पुजा आजही मोठ्या आस्थेने केली जाते. यालाच 'गराशा' असेही म्हटले जाते.
 
भारतीय गोर-बंजारा समाजगण हासमाज एक आदिम क्षत्रिय समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. गोर बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. उपजतच कष्टाळू, मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.
 
संपूर्ण भारतात गोरबंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या वस्त्या आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात अविरत भटकंतीचे जीवन जगत होता. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उद्ध्वस्त झाल्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. गोरबंजारा वस्तीस्थानास 'तांडा' असे म्हणतात. 'तांडा' मध्ये प्राचीन काळापासून आजही 'सेनं सायी वेस' ही वैश्विक कल्याणासाठी सामुदायिक प्रार्थना केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=LOHGARH -The worlds largest fort,The capital of the sikh kingdom |दुवा=https://bluerosepublishers.com/product/lohgarh-the-worlds-largest-fortthe-capital-of-the-sikh-kingdom/|publisher=ब्ल्यू रोज पब्लिशर्स|year=२०१९|isbn=|location=दिल्ली}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=बंजारा लोगोका इतिहास|last=पाटील|first=बळीराम हिरामण|publisher=नवदुर्गा प्रकाशन|year=२०१२|location=गुजरात}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=बंजारो का सांस्कृतिक इतिहास|last=राठौड|first=डॉ. जयपाल सिंह|publisher=राजस्थानी ग्रंथागार|year=२०१५|isbn=|location=जोधपूर, राजस्थान}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=मारवाड की सांस्कृतिक धरोहर|last=राठोड|first=डॉ. गोविंदसिंह}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=गोर वंश का इतिहास|last=कापडी|first=रामसिंह|year=१९६३|location=हरियाणा}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=गोर राजपूतो के अनमोल रतन|last=बलजोत|first=इंदरसींग|year=२०१२|location=पंजाब}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=History of Medieval Hindu|last=Vaidya|first=C. V.|year=१९२१}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
४१९

संपादने