"जोसेफ स्टॅलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{साम्यवाद}}
 
जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली ऊर्फ '''जोसेफ स्टालिन''' (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म [[डिसेंबर २१]] [[इ.स. १८७९|१८७९]] रोजी सध्याच्या [[जॉर्जिया (देश)|जॉर्जिया (देशातील)]] तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. [[सोवियेत संघ|सोवियेत संघास]] जागतिक महाशक्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य कुटुंबातले होते. त्यांचे वडील विसारिओन इव्हानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जियेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती, पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली होती.
 
स्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले.