"कस्तुरबा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१८ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
संदर्भ जोडला
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
(संदर्भ जोडला)
 
१९०६ साली गांधीजींनी [[ब्रम्हचर्य]] पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप [[धार्मिक]] होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी [[जातिभेदाचा]] त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या [[आश्रमात]] राहिल्या.
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/kasturba-gandhi-is-the-first-woman-in-the-country-to-launch-the-satyagraha-movement/articleshow/74295715.cms|title=कस्तुरबा देशातील पहिल्या सत्याग्रही:तुषार गांधी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-10-02}}</ref> १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेस]] गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या [[दरबान]] शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील [[भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत]] त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.
 
==चरित्र==
१५,०४३

संपादने