"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.
 
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.
 
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.
 
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
 
छत्रपती [[शिवाजी महाराज]] यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख [[सेनापती]] म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
Line १४ ⟶ ९:
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकडपर्यंतच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.
 
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नंतर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.
 
मोहिते घराण्याच्या इतिहासाला ज्ञात असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते .
 
== संभाजी पाठीशी खंबीर मामा हंबीर ==