"अकोला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वाहतूक मध्ये माहिती जोडली
ओळ ७१:
 
=== वाहतूक ===
[[मुंबई]] ते [[कोलकाता]] या [[मध्य रेल्वे]]मार्गावरील; तसेच अजमेर-पूर्णा या मार्गावरील [[अकोला रेल्वे स्थानक|अकोला]] हे महत्त्वाचे जंक्शन आहे. हे रेल्वेने मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, नांदेड, इंदूर, जयपूर, कोल्हापूर या शहरांशी थेट जोडलेला आहे.
 
दक्षिण मध्य रेल्वेवरील पूर्णा-अकोला हा मार्ग ४ वर्षापूर्वी ब्रॉडगेज करण्यात आला आहे. ह्या मार्गावरून आता अकोला-पूर्णा, अकोला-काचीगुडा, नागपूर-कोल्हापूर अशा रेल्वेगाड्या धावत आहेत. पण अजूनही अकोला-खांडवा हा रेल्वेमार्ग मीटर गेजवरच आहे. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यास चेन्नई-दिल्ली मार्गावरील सर्वांत कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या ह्या मार्गावरून अकोला-महू, अकोला-खांडवा, अकोला-जयपूर अशा रेल्वेगाड्या धावतात.
ओळ ७७:
२००९मध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर शिवनी-शिवर येथे नवीन स्थानक झाले आहे. ते मुख्यत: औद्योगिक परिसरातील मालवाहतुकीसाठी बांधण्यात आले आहे. ह्या मार्गावरून अकोला-धुळे, अकोला-नागपूर आणि अकोला-नांदेड अशा पॅसेन्जर ट्रेन्स सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
 
अकोला हे राष्ट्रीय महामार्ग ६ वर असून त्याद्वारे ते [[मुंबई]], [[कोलकाता]], [[सुरत]] ह्या शहरांशी जोडलेले आहे. हा मार्ग ४ पदरी करण्याचा प्रस्ताव मान्य झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय अकोला-हैदराबाद हा [[नांदेड]] मार्गे जाणारा राज्यराष्ट्रीय महामार्ग आहे. त्यापेकी अकोट-अकोला-वाशीम-हिंगोली हा, व बाळापूर-पातूर हा राज्य महामार्ग ४ पदरी होण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. इंदूर-अकोला-नांदेड-हैदराबाद हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्याची मागणी होत आहे.
 
अकोला इथे हवाई वाहतुकीसाठी विमानतळ आहे. सध्या विस्तारीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, विस्तारीकरणासाठी लागणारी जमीन कृषिविद्यापीठाकडून मिळविण्यात अडचणी येत आहेत. हे विस्तारीकरण झाल्यास पश्चिम विदर्भातील औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ अतिशय उपयोगी ठरणार आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अकोला" पासून हुडकले