"मधुकर विश्वनाथ लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
'''मधुकर विश्वनाथ लिमये''' (जन्म : [[इ.स. १९२४|१९२४]]; मृत्यू :- [[४ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१५|२०१५]]) हे ईशान्य भारतातल्या [[आसाम]]च्या निरनिराळ्या भागांमध्ये ६० वर्षे वस्तव्य करून राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. एखाद्या सेवाव्रती व्यक्तीप्रमाणे त्यांनी संघाचे कार्य तेथे रुजवले अणि वाढवले. तेथील लोकांना भारतीयांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी संघाकडून होत असलेल्या कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.
 
मुंबईत गिरगावात रहात असताना मधुकर लिमये अगदी लहान वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली एम.एस्‌सी. झाल्यावर त्यांनी संघाच्या पूर्णवेळ प्रचारकाचे काम स्वीकारले. त्यांना महाराष्ट्राच्या पालघर तालुक्यात काम करायला पाठविण्यात आले. दोनच वर्षांनी म्हणजे १९५० साली मधुकररावांना संघकार्यासाठी ईशान्य भारतात पाठविले गेले. संघावर बंदी असलेल्या कालखंडात ईशान्य भारताच्या दुर्गम भागांत आणि भारतीय उपखंडातील लोकांपासून मनाने दुरावलेल्या लोकांच्या प्रदेशात, त्यांनी नौगाव या छोट्या शहरापासून अत्यंत खडतर वातावरणात आपल्या कार्याला सुरुवात केली, आणि त्यानंतर कोणतेही स्वयंचलित वाहन हातात नसताना आणि सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही सोय नसताना, केवळ सायकलीवरून आसामच्या दूरदूरच्या कोपर्‍यांपर्यंत पोहोचून मधुकर लिमयेंनी संघ प्रचारकाचे काम आणि अन्य समाजकार्य केले. आसाम हे त्यांचे मूळ घरच झाले होते.