"मल्लखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो →‎बाळंभट देवधर: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ८:
कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा व किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल; पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मनाला जातो. या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो.यातील कौशल्ये करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायची असल्याने शरीराच्या आतील इंद्रियांच्या क्रिया सुधारतात. शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे तान पडून ते मजबूत होतात. या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते.या शारीरिक कौश्ल्यंत पुष्कळ वेळा, खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते, त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते. थोडक्यात, आपल्या असे लक्षात येते, की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब उपयुक्त आहे.
==बाळंभट देवधर==
दुसऱ्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून [[बाळंभट देवधर]] (जन्म : इ.स. १७८०; मृत्यू :- इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मुळच्या साताऱ्याच्या परंतु सध्या पुणेस्थित मनीषा बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. [[बडोदा]] येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंडात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहेर [[उज्जैन]] आखाडा, [[झांशी]] व [[ग्वाल्हेर]] आखाड्यांचे स्मृतिअंक आणि [[वाराणसी]] येथील व्यायाम नावाच्या मासिकात बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. [[गुजराथ]]मध्ये आजही मल्लखांब असलेले आखाडे आहेत.
 
मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. [[सदाशिव शिवदे]] यांनी ‘एक होता बाळंभट’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. [[बडोदा]], [[मिरज]] आणि [[वाराणसी]] येथे सापडलेले ग्रंथ, कागदपत्रे, आखाड्यांची इतिवृत्ते यांच्या आधारे हा चरित् ग्रंथ लिहिणे शक्य झाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मल्लखांब" पासून हुडकले