"नारायण मेघाजी लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (याच लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला आणि 10 जून 1890पासून रविवार ही साप्तताहि सुुुटी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे. स्त्रोत: https://mr.vikaspedia.in/education/apala-bharath/92d93e930924-92a94d93093893f92794d926-93594d92f91594d924940/92893e93093e92f923-92e94791893e91c940-93294b9)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
रावबहाद्दुर '''{{लेखनाव}}''' (जन्म : इ.स. ८ फेब्रुवारी, १८४८; मृत्यू :- ९ फेब्रुवारी, [[इ.स. १८९७]]) हे एक [[भारत|भारतीय]] कामगार पुढारी होते.
 
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर. माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी [[बॉंबे मिलहॅंड्‌स असोसिएशन|बॉंबे मिल हॅंड्‌स असोसिएशन]] ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
७५,८३८

संपादने