"सुचेता कृपलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
{{विकिडेटा माहितीचौकट}}
 
सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; मृत्यू :- १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. {{संदर्भ हवा}}
 
सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली [[आचार्य कृपलानी|आचार्य कृपलानींशी]] लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.{{संदर्भ हवा}}