"शरच्चंद्र दामोदर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1219449 by ज on 2014-01-19T18:38:08Z
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ २:
 
 
डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले (जन्म : पुणे, २२ सप्टेंबर १९२५; मृत्यू :- पुणे, १५ जानेवारी २०१३) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी समाजशास्त्रज्ञ होते.
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ' मास्टर ऑफ सोशल वर्क ' ही पदवी घेतल्यानंतर सरकारी सेवेच्या माध्यमातून त्यांनी कार्याला प्रारंभ केला. समाजकल्याण खात्यातील वरिष्ठ पद सोडून त्यांनी पूर्णवेळ समाजोपयोगी कामाला वाहून घेतले. पुण्यातील कास्प (Community Aid and Sponsorship Programme), आंतरराष्ट्रीय लेप्रसी युनियन व आंतराराष्ट्रीय दीर्घायू युनियन या संस्थांचे ते संस्थापक-विश्वस्त होते. पुण्यातीलच ’केसरी’ या वृत्तपत्राचे ते एकेकाळी संपादक होते. शरच्चंद्र गोखले हे मान्यवर लेखक होते. युनायटेड नेशन्स, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.