"योगिराज बागुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''योगीराज बागूल''' हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांनी आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम करुन आणि माळाला व गायरानात गुरे राखत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
 
योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावच्या जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले. साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जीवन आणि कार्य हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत.{{संदर्भ हवा}} त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.{{संदर्भ हवा}}