"करडा (वाशिम)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
 
== इतिहास ==
या गावाच्या रचनेवरून हे गाव प्राचीन नसावे याला पुष्टी मिळते. गावात एकही जुने मंदिर नाही. जुनी वास्तू म्हणावी ती केवळ गढी आहे. ती पूर्णतः ढासळली आहे; मात्र निजाम, मोगल यांच्या कार्यकाळातच गढ्या बांधल्या गेल्या. परिणामी, हे गाव ३५० ते ४०० वर्षांपूर्वीचे असावे असे वाटते. गावातील घरांची बांधणीसुद्धा आधुनिक आहे. जुन्या पद्धतीचा केवळ एकच वाडा आहे.वतनदार साहेबराव गंगाजीराव देशमुख तो पाटलांचा वाडा म्हणून ख्यातीप्राप्त आहे.
 
असे असताना गावाच्या एका कडेला एक टेकडी आहे. या टेकडीखाली शेकडो वर्षांपूर्वी दडलेले देवीचे मंदिर आहे, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने या टेकडीची पूजा करतात. या टेकडीचे उत्खनन झाल्यास गावाचा खरा इतिहास समोर येईल, या हेतूने माजी सरपंच अशोकराव देशमुख यांनी पुरातत्त्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु संबंधितांनी दखल घेतली नाही. सध्या आता या टेकडीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून देवीचे छोटे मंदिर बांधले आहे. ॠषीटेकडी म्हणून तिची ओळख आहे.