"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Reverted 1 edit by 2409:4042:2602:D6C1:4D16:7016:A486:DB9B (talk) to last revision by सांगकाम्या(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ २२:
जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.
 
महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. [[आर्य]] लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या, त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
 
महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे [[विठोबा]], [[म्हसोबा]], [[खंडोबा]], ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. [[वऱ्हाड]]प्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/12528-2013-03-13-06-52-19|title=महार|last=memberj|website=ketkardnyankosh.com|language=en-gb|access-date=2018-03-19}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले