"नांदेड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
added link for a word and corrected some geograhapical info.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
added link for a word
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३१:
 
==नांदेड जिल्ह्याची सामाजिक व धार्मिक स्थिती ==
नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिंदू, मुस्लिम, बौध्द, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असून जैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या नाभीस्थळी वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे दहावे गुरु श्रीगुरु गोविंदसिंघजी यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. माहूर किल्ला परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला, हजार वर्षापूर्वी बांधलेला "जगतूंग सागर" साठवण तलाव आहे. त्याठिकाणी दोन दर्गाही आहेत. दरवर्षी कंधारचा 'उरुस' या नावाने फार जत्रा भरते. लोहा तालुक्यात माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी फार मोठी जत्रा भरते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. देगलूर ( होट्टल ) येथील सिध्देश्र्वराचे मंदिर, धुंडा महाराज देगलूरकराची वारकरी संप्रादायाची ध्वजा हे प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यात [[सहस्रकुंड धबधबा|सहस्त्रकुंड धबधबा]], उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. अशा रितीने सामाजिक व धार्मिक गौरवशाली परंपरा नांदेड जिल्ह्यास लाभलेली आहे.<ref>{{स्रोत बातमी|last1=देशमुख|first1=रा. नी|title=आपला नांदेड जिल्हा|प्रकाशक=कल्पना प्रकाशन|दिनांक=२०११}}</ref>
 
==नांदेड जिल्ह्यातील राजकीय स्थिती ==