"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:1987:30A:78DF:7D7F:743F:C1AA (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
चित्र जोडले. #WPWP
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Chanakya artistic depiction.jpg|अल्ट=चाणक्य, आधुनिक कल्पनाचित्र|इवलेसे|चाणक्य, आधुनिक कल्पनाचित्र]]
'''चाणक्य''' (इतर नावे: '''विष्णुगुप्त''', '''कौटिल्य''') (कालमान: अंदाजे [[इ.स.पू. ३५०]]च्या सुमारास) हा [[सम्राट चंद्रगुप्त मौर्य|सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या]] राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा ग्रंथ [[भारतीय संस्कृती]]तील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ [[अर्थशास्त्र]] व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, [[योगेश्वर याज्ञवल्क्य|योगेश्वर याज्ञवल्क्याने]] लिहिलेली [[याज्ञवल्क्य स्मृती]] व [[वात्सायन|वात्सायनाने]] लिहिलेले [[कामसूत्र]] हे ग्रंथ. [[पंचतंत्र]] या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्तादेखील ''ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि'' या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले