"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४४:
 
==इतिहास==
इतिहासात दिल्ली सल्तनत, मुगल व मराठा साम्राज्याच्या राजवटीत फैजपूर हे गाव [[खानदेश]] प्रांतात होते. ब्रिटीश राजवटीत ब्रिटीशांनी खानदेशचा मुंबई प्रांतात समावेश करून त्याला जिल्हा बनवण्यात आले. तत्कालिन खानदेश जिल्ह्यात फैजपूर हे गाव सावदा तालुक्यात होते. खानदेश जिल्ह्याच्या विभाजनानंतर फैजपूरचा पूर्व खानदेश जिल्ह्याच्या यावल तालुक्यात समावेश करण्यात आला. भारतच्याभारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मुंबई प्रांतचे मुंबई राज्य बनले व १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दरम्यान पूर्व खानदेश जिल्ह्याचे नामांतर जळगाव जिल्हा असे करण्यात आले.
 
पूर्वीच्या काळात [[यावल]]<nowiki/>हून [[बऱ्हाणपूर]]<nowiki/>ला जाणाऱ्या फौजांचा मुक्काम येथे असायचा. त्यामुळे हे ठिकाण फौजपूर, आणि फौजपूरचे फैजपूर झाले असावे, असे म्हटले जाते.
ओळ ५४:
फैजपूर हे पूर्वी खान्देशातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या शहरांपैकी एक होते.
 
फैजपूरला रंगकामाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता. रंगारघाटीत रंगारी भावसार यांनी तयार केलेला रंग खूप प्रसिद्ध होता. [[अजिंठा लेणी|अजिंठा]] येथे जो निळा रंग आहे तो तेथूनचयेथूनच नेला आहे, असे सांगतात. रंगारी रंग तयार करून सूत रंगवत असत. त्या सुताला सर्वत्र मागणी होती. आता तो व्यवसाय नामशेष झाला आहे. भावसार समाजाचे लोक वेगवेगळ्या व्यवसायांकडे वळले आहेत. तेथीलयेथील हातमागाच्या बुगडी काठांच्या खणांना परिसरातच काय, पण बाहेरगावातही मागणी असायची. घरोघर, हातमाग चालवणारे विणकर मोठ्या प्रमाणात होते. तो व्यवसाय दृष्टिदुर्लभ झाला आहे.
 
गावात पूर्वी जिनींग अँड प्रेसिंगचे कारखाने होते. गावात कापसाचा व सरकीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. त्याचप्रमाणे फैजपूर हे पूर्वी त्याच्या ऑइल मिल्ससाठीसुद्धा प्रसिद्ध होते. येथील तेल देश विदेशात निर्यात होत असे. सद्यस्थितीत त्यातील केवळ एक ऑइल मिल कार्यान्वयित असून अन्य मिल्स बंद झाल्या आहेत. बुधवारी फैजपुरात गावरान तुपाचा बाजार वाणी गल्लीत भरायचा. या भागाला आजही तूप बाजार म्हणून ओळखले जाते. फैजपूर येथे असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना हा जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात पहिले उभारला गेलेला साखर कारखाना आहे.