"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५८:
 
== संत खुशाल महाराज ==
फैजपूर हे संत खुशाल महाराजांसाठी सुद्धा ओळखले जाते. त्या संतांच्या संदर्भात एक आश्चर्यकारक घटना लोकमानसात रूढ आहे. संत खुशाल महाराजांना देणे असलेले लखमीचंद सावकाराचे दोनशेचाळीस रुपये प्रत्यक्ष विठ्ठलाने अदा केले असे म्हटले जाते. त्यासंबंधीची 1837१८३७ मध्ये विठ्ठलाला दिलेली मोडी लिपीतील पावतीही खुशाल महाराजांच्या मंदिरात उपलब्ध आहे! महाराजांच्या नावाने कार्तिक महिन्यांत फैजपूर येथे रथोत्सव साजरा होतो. महाराजांचे पुत्र श्रीहरी महाराज यांनी ती प्रथा खुशाल महाराजांच्या मृत्यूनंतर, 1885१८८५ साली सुरू केली. खुशाल महाराजांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात ‘श्रीदशावतार चरित्र ग्रंथ’ हा महत्त्वपूर्ण आहे. त्या ग्रंथाचे एकूण सेहेचाळीस अध्याय आहेत. खुशाल महाराजांना त्यांनी वीस अध्याय लिहिल्यावर देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीहरी महाराज यांनी सव्वीस अध्यायांची भर घालून ग्रंथ पूर्ण केला. तो ग्रंथ पितापुत्रांच्या एकात्म भावनेमुळे सलग असाच वाटतो. पांडुरंग स्वप्नात येणे, विठ्ठलाची मूर्ती सामानात येणे वगैरे कथा संत खुशाल महाराजांच्या चरित्रात आहेत. त्या कन्हैयालाल धोंडू मोरे यांनी ‘श्रीव्यासपुरी महात्म्य’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.