"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे (50 वे) आणि प्रथम ग्रामीण अधिवेशन हे 27 आणि 28 डिसेंबर 1936 रोजी फैजपूर येथे करण्यात आले होते. या अधिवेशनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेससाठी फैजपूर अधिवेशन महत्त्वाचे होते. फैजपूर अधिवेशनचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते जे तत्कालीन काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते आणि राजमल ललवाणी त्या परिषदेचे कोषाध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधी व इतर दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. त्या ठिकाणी आता ‘नेहरू विद्यानगर’चा परिसर आहे. तेथे धनाजी नाना विद्यालय, बी.एड. कॉलेज व फार्मसी इन्स्टिट्यूट आहेत. या अधिवेशनाचा देखावा शहरातील छत्री चौकातल्या भिंतीवर साकारण्यात आले आहे.
 
== संत खुशाल महाराज ==
फैजपूर हे संत खुशाल महाराजांसाठी सुद्धा ओळखले जाते. त्या संतांच्या संदर्भात एक आश्चर्यकारक घटना लोकमानसात रूढ आहे. संत खुशाल महाराजांना देणे असलेले लखमीचंद सावकाराचे दोनशेचाळीस रुपये प्रत्यक्ष विठ्ठलाने अदा केले असे म्हटले जाते. त्यासंबंधीची 1837 मध्ये विठ्ठलाला दिलेली मोडी लिपीतील पावतीही खुशाल महाराजांच्या मंदिरात उपलब्ध आहे! महाराजांच्या नावाने कार्तिक महिन्यांत फैजपूर येथे रथोत्सव साजरा होतो. महाराजांचे पुत्र श्रीहरी महाराज यांनी ती प्रथा खुशाल महाराजांच्या मृत्यूनंतर, 1885 साली सुरू केली. खुशाल महाराजांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात ‘श्रीदशावतार चरित्र ग्रंथ’ हा महत्त्वपूर्ण आहे. त्या ग्रंथाचे एकूण सेहेचाळीस अध्याय आहेत. खुशाल महाराजांना त्यांनी वीस अध्याय लिहिल्यावर देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीहरी महाराज यांनी सव्वीस अध्यायांची भर घालून ग्रंथ पूर्ण केला. तो ग्रंथ पितापुत्रांच्या एकात्म भावनेमुळे सलग असाच वाटतो. पांडुरंग स्वप्नात येणे, विठ्ठलाची मूर्ती सामानात येणे वगैरे कथा संत खुशाल महाराजांच्या चरित्रात आहेत. त्या कन्हैयालाल धोंडू मोरे यांनी ‘श्रीव्यासपुरी महात्म्य’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.